Dally Update

वाहनाने कट मारल्याने ट्रकखाली येवुन एक युवक मानराजपार्क जवळ अपघातात ठार

                                                                                   मयत संजोग सुरेश सपकाळे

योगश महाले – प्रतिनिधी 883030120 – जळगांव – रग्णालयात दाखल असलेल्या आपल्या चुलत भावास जेवणाचा डबा देण्यासाठी आपल्या चुलत्या सोबत येत असतांना दुचाकीस वाहनाचा कट लागला व खाली पडुन ट्रक खाली आल्याने संजोग सुरेश सपकाळे वय 20 रा गाढोदा ता. जळगांव हा तरुण जागीच ठार झाला त्याचे चुलते नवल बिसन सपकाळे वय 47 रा गाढोदा ता. जळगांव हे जखमी झाले आहे. हा अपघात सोमवार दि 4 रोजी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास मानराजपार्क जवळ झाला अपघात ट्रक तेथुन पसार झाला असता नागरीकांनी पुढील चौफुलीवर ट्रक डायव्हरला पोलीसांच्या ताब्यात दिले सदर तरुणाचा मृतदेह व जखमीला शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयत दाखल केले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालु होते.