Dally Update

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप

पारोळा 17 फेब्रुवारी ( योगेश महाले ) – इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते.त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी दिनांक 27/10/2020 रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या 10 लक्ष नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला. [Bandhkam Kamgar Yojana]

गृहपयोगी वस्तू संचामध्ये खालील वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे

गृहपयोगी संचातील वस्तूनग
1ताट04
2वाटया08
3पाण्याचे ग्लास04
4पातेले झाकणासह01
5मोठा चमचा01
6(भात वाटपाकरीता)01
7मोठा चमचा (वरण वाटपाकरीता)01
8पाण्याचा जग (२ लीटर)01
9मसाला डब्बा (०७ भाग)01
10डब्बा झाकणासह (१४ इंच)01
11डब्बा झाकणासह (१६ इंच)01
12डब्बा झाकणासह (१८ इंच)01
13परात01
14प्रेशर कुकर -०५ लिटर (स्टेनलेस स्टील)01
15कढई (स्टील)01
16स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह01
एकूण29
Breaking News