Dally Update

पारोळा येथे येत्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळयाचा लोकार्पण सोहळा होणार

पारोळा 17 फेब्रुवारी ( योगेश महाले ) – राज्या बरोबर देशभरात छत्रपती शिवाजी महारांजाची 19 फेब्रुवारी मोठया उत्साहात जयंती साजरी होणार असून या पार्श्वभुमीवर रविवारी 18 फेब्रुवारी रोजी पारोळा येथे शिव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महारांजाच्या अश्व आरुढ पुतळयाचे लोकार्पण तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे लोकार्पण मा. आमदार एरंडोल विधान सभा चिमणराव रुपचंद पाटील यांचे हस्ते होणार आहे तसेच एरंडोल नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या शिवव्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. चे उपाध्यक्ष अमोल चिमणराव पाटील यांची या कार्यक्रमास उपस्थीत राहणार आहे.


खालील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन राहणार आहे

  • पारोळातील आझाद चौक – रथ चौक – नगरपरिषद चौक -शिवतीर्थ परिसरातुन सांयकाळी 5 वाजे पासुन भव्य मिरवणुक सोहळा
  • मिरवणुकीचे मुख्य आकर्षण – दुर्गा वाहिनी संचालित दुर्गा शौर्य तर्फे दंड प्रदर्शन, लेझिम व नाशिक ढोल.
  • सांयकाळी 7:30 वाजता – राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोकार्पण सोहळा.
  • रात्रो 8 वाजता भव्य शिव व्याख्यानाचा कार्यक्रम ठिकाण – शिवतिर्थ पारोळा.