अज्ञात व्यक्तींकडून महामार्ग 6 वरील सबगव्हान गावा जवळील टोल नाका पेटविला सदरील घटना सिसिटीव्हीत कैद
योगेश महाले – 8830901020 – पारोळा तालुक्याच्या हददीवर महामार्ग सहावर सबगव्हाण गावाजवळ नुकत्याच दि. 10 मार्च रोजी चालु झालेल्या टोल नाक्याला अज्ञात व्यक्तींनी विना नबंरची गाडीत येवून ज्वलनशील पदार्थ टाकुन या टोलनाक्याची कॅबीनला आग लावुन तसेच कार्यालयाची तोडफोड केली आहे सदरची घटना आज रोजी सकाळी 3 ते 4 वाजेच्या दरम्यानची असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. सदर हा टोल नाका नागपुर ते मुंबई महामार्ग वर नविनच सुरु करण्यात आला आहे यामहामार्गाचे काम हे अद्याप अपूर्ण आहे पूर्ण होण्या अगोदरच हा टोल नाका सुरु करण्यात आला आहे. या घटनेमुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले कायदा व सुरेक्षाचा प्रश्न एैरणीवर आला आहे.
सदर घटनेचे शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पारोळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम चालु होते.