भडगांव येथे येत्या 15 फेब्रुवारी रोजीअदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन
भडगांव येथे येत्या 15 फेब्रुवारी रोजी
अदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन
भडगाव (दिनांक १२ प्रतिनिधी) – पाचोऱ्यात आजवर चार ते पाच सभा अतिशय उदंड उत्साहात पार पडल्या असून याचप्रमाणे भडगावातील पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची होणारी सभा ही ऐतिहासिक पद्धतीत पार पडेल, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्यांनी आज भडगाव येथील सभास्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला, नंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. भडगाव येथे युवा सेनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा गुरूवार १५ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. याच्या नियोजनासाठी आज वैशालीताई सुर्यवंशी यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, शिवसेना पक्षात गद्दारी झाल्यानंतर वडील उध्दव ठाकरे हे संकटात असल्याचे पाहून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे राज्यभरात दौरे सुरू केले असून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. दोन वर्षापूर्वीचे आदित्य ठाकरे आणि आताचे अदित्य ठाकरे यात मोठा फरक झाला आहे. आपल्या वडीलांची तब्बेतीकडे लक्ष देवून त्यांनी स्वत: आता मैदानात उतरून निष्ठा यात्रेला सुरूवात केली आहे. त्यामुळे गुरूवार १५ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांचा जिल्हा दौरा जळगाव ग्रामीण पासून होत आहे. त्यानंतर भडगाव शहरात त्यांची सभा होणार आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी अचुक नियोजन करण्यासाठी प्रत्येक बुथच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले. मला राजकरणाचा वारसा जरी असला परंतु प्रत्यक्षात कामाचा कोणताही अनुभव नाही. परंतु आज जे काही करत आहे ते कार्यकर्त्यांच्या भरवस्यावर करत आहे. त्यांच्या कामाची एनर्जी पाहून मला कामाची डबल एनर्जी मिळत असल्याचे देखील वैशालीताई सुर्यवंशी यांनी यावेळी बोलतांना सांगितले. याप्रसंगी शिवसेना युवा सेना चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.