News

अज्ञात महिले स्वत:वर ज्वलनशिल पदार्थ टाकुन केली आत्महत्या – पारोळा

अज्ञात महिले स्वत:वर ज्वलनशिल पदार्थ टाकुन केली आत्महत्या – पारोळा

पारोळा – पारोळा तालुक्यात कजगांव रस्त्यावर भोसले यांच्या कुकुटपालन शेड पासुन 30 मी जवळ वाकडयापुलाच्या खाली एका अज्ञात महिलेने स्वत:च्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकुन आत्महत्या केल्याची एक खळबळ जनक घटना घडली आहे प्राप्त माहिती नुसार पारोळा कजगांव रस्त्यावर भोसले यांच्या कुकुटपालन शेड पासुन 30 मी अंतरावर वाकडयापुल आहे त्या पुलाच्या खाली एका अज्ञात माहिलेने वय अंदाजे 25 ते 30 स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकुन जाळुन घेतल्याने त्या माहिलेचा घटना स्थळीच मयत झाल्याची आज 4.40 वाजे सुमारास उघडीकीस आली. या घटनेमध्ये त्या माहिलेचा चेहरा हा पुर्ण जळून काळा झाला असल्याने ओळख पटविण्याचे आव्हान पारोळा पोलीसांनी केले आहे.मयत महिलेचे वर्णन असे की बांधा मजबुत, रंग निम गोरा उंची 5 फुट 3 इंच अंगात गुलाबी लाल रंगाची जळालेल्या अवस्थेतील साडी, चेहरा डोक जळुन पुर्णपणे काळा झालेला आहे. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत सदर महिले मृत शरीर पारोळा पोलीस स्टेशनला नेण्यासाठी रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकुर, आशुतोष शेलार, पोलीस निरीक्षक गंभीर शिंदे, किशोर भोई व टेहु येथील पोलीस पाटील योगेश महाले सहकार्य केले सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन यात महिलेने आणलेले पेट्रोलची बाटली तसेच कपडयाचे नमुने व चप्पल ताब्यात घेण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे