भडगांव : पत्रकार सोनवणे यांचे दुःखद निधन,सकाळी फिरायला गेलेल्या पत्रकाराचा सर्पदंशाने दुर्दवी मृत्यू•
पाचोरा – भडगांव : पत्रकार सोनवणे यांचे दुःखद निधन,
सकाळी फिरायला गेलेल्या पत्रकाराचा सर्पदंशाने दुर्दवी मृत्यू•• पाचोरा (वार्ताहर) दि,११ – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रमोद हिम्मत सोनवणे वय ४२ यांचे सर्पदंश झाल्याने मृत्यू ओढवल्याची दुर्दवी घटना रविवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे देखील अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यामुळे सोनवणे परिवारावर मोठा आघात झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव येथील रहिवासी असलेले प्रमोद सोनवणे हे नित्यनियमा प्रमाणे रोज सकाळी फिरायला गेले असता अंधारात त्यांना अचानक काहीतरी चावल्याची जाणीव झाल्याने त्यांनी सहकारी मित्र अबरार मिर्झा यांना याबाबत सांगितले,त्यामुळे मिर्झा यांनी त्यांना तातडीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान पाचोरा ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात १ मुलगी, १ मुलगा आई , भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव होता. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.