आज आदित्य ठाकरे जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांच्या लोकसभा क्षेत्रात चार सभा
जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 15 गुरुवार रोजी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गुरुवारी एकाच दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघातील चार ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ठाकरेंच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
संभाची वेळ व ठिकाण
जळगाव शहरातील सुभाष चौक : सकाळी 11:30 वाजता
शिरसोली :दुपारी २ वाजता
कासोदा, ता. एरंडोल : ४ वाजता
भडगाव : ६ वाजता
आगामी लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने जळगांव लोकसभा मतदार संघावर फोकस करण्यात आले आहे.